Home क्राईम वकीलाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वकीलाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
49


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील अतिथी हॉटेलच्या बाजूला रोडवरून एका तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी १२ मे रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिफ पिंजारी (वय-३०)  रा. पोलीस मुख्यालय, जळगाव हे वकील असून वकिलीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ मे रोजी दुपारी २ वाजता आरिफ पिंजारी हे त्यांची दुचाकी (एमएच 39एल १४१९) ने जळगाव शहरातील अतिथी हॉटेलच्या बाजूला असलेल्या रोडवर आले होते. त्या ठिकाणी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती व कामानिमित्त निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किंमतीची त्यांची दुचाकी चोरून नेली. दुपारी ३ वाजता आरिफ पिंजारी हे दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आले नाही. त्या परिसरात त्यांनी दुसरी सर्वत्र शोध घेतला, कुठलीही माहिती न मिळाल्याने अखेर रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापूराव बडगुजर करीत आहे.


Protected Content

Play sound