Home Cities एरंडोल जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्यपदी प्रा. शिवाजीराव अहिरराव यांची निवड

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्यपदी प्रा. शिवाजीराव अहिरराव यांची निवड


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगांव जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद अशासकीय सदस्य म्हणून जेष्ठ पत्रकार तथा अ. भा. ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दलचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ३० एप्रिल २०२३ अन्वये नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत.

यापुर्वी देखिल प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य म्हणून काम केलेले आहे. ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, विजय मोहरील आदींची देखिल निवड करण्यात आली. सदरची निवड तीन वर्षासाठी करण्यात आली असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. एरंडोल वीज वितरण, वस्तु खरेदी, ट्रॅव्हल्स् कंपनी तक्रारी यशस्वी सोडवून न्याय मिळाला आहे. प्रा. शिवाजीराव अहिरराव यांच्या सुयोग्य निवडीचे अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound