रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथील रावेर पिपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १३ जागांसाठी ९१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उद्या दाखल केलेल्या अर्जाची छानणी होणार आहे.
रावेर पिपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक आहे.येथे शेवटच्या दिवासा पर्यंत ९१ उमेवदारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.यात सर्वसाधारण मध्ये ५२ अर्ज अनुसूचित जाती जमातीसाठी ६ अर्ज भटक्या जाती जमाती मध्ये ३ अर्ज इतर मागासवर्गीय मध्ये १७ अर्ज आणि महिला राखीव मध्ये १३ अर्ज प्राप्त झाले आहे.उद्या दाखल झालेल्या सर्व अर्जाची छानणी होणार आहे.२९ मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येईल.१० जुनला निवडणुक होवून ११ जुनला मतमोजणी होईल.
—