फैजपूर प्रतिनिधी । ‘थेंब अमृताचा’ लोक सहभागातून जलसमृद्धी, जलक्रांती अभियानाच्या माध्यमातून फ़ैज़पुर येथील धाडी नदीवर जलसंधारणाचे काम सुरु आहे. पाण्याचे निर्माण झालेले दुर्भिक्ष बघता अभियानाला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोकांचा सह्भाग ही मोठ्या प्रमाणात लाभत आहे.
याबाबत माहिती अशी की, फैजपूर, आमोदा, पिंपरूड, विरोदा, वढोदा, सावदा, कोचुर आणि रझोदा शिवारातील पाणी पातळी वाढणार आहे.
आमदार हरीभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून आणि संत महंत यांच्या आर्शिवादाने सुरु असलेल्या कामावर संत महंत बारीक लक्ष ठेवत असून, त्याच माध्यमातून फैजपूर शिवारातील धाडी नदीवर प.पु. महामडलेश्वर जनार्दन हरी महाराज, आमदार हरिभाऊ जावळे यांनी भेट देऊन, पाहणी केली आहे. नदीवरील होत असलेल्या कामाच्या प्रती समाधान व्यक्त केले आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, सागर होले, नामदेव होले, संदीप चौधरी, पराग चौधरी, टेकचंद होले, मोहन होले, चोलदास चौधरी, प्रकाश चौधरी, राजू चौधरी, विकी किरंगे आणि समस्त फैजपूरवासी उपस्थित होते.