पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील देशमुखवाडी मधील प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ७ मे रोजी दि. जळगांव पीपल्स बँक, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट राजेश्री श्री. छत्रपती शाहु महाराज हाॅस्पिटलच्या विद्यमाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत भव्य अशा मोफत हृद्यरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुर अनिल झवर यांनी रुग्णांची सखोल आरोग्य तपासणी करुन घेतली. या आरोग्य शिबिरात मोफत बी. पी. माॅनिटर तपासणी, ई. सी. जी., गरज भासल्यास मोफत एंजीओग्राफी व २ डी. इको याचा समावेश होतो. आयोजित या मोफत हृद्यरोग तपासणी शिबिरात जळगांव येथील राजेश्री श्री. छत्रपती शाहु महाराज हाॅस्पिटलचे आयोजक प्रतिक सोनार, परिचारिका हर्षा नन्नवरे, राखी शिंदे, परिचारक महेश पाटील यांनी शिबिरात आलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी केली. याप्रसंगी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र सुनिल परखड हे शिबिरा दरम्यान उपस्थित होते.