जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवार ७ मे रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात लक्झरी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, छाया योगेश वाणी (वय-४७, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दैनंदिनीप्रमाणे १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता छाया वाणी ह्या दुचाकी (एमएच १९ डीपी ५५५६) ने आकाशवाणी चौकातून जात असताना मागून येणारी लक्झरी बस क्रमांक (एमएच १९ सी डब्ल्यू ५९६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्या दुचाकीसह रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या हाताला पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर अखेर रविवारी ७ मे रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्र पाटील करीत आहे.