जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते तसेच सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाच्या निवृत्तीच्या निर्णयावर आता जळगावतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं असून शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम्हीही काम करणार नाही, आमचे देखील राजीनामे आम्ही पक्षाकडे पाठवू असे स्पष्ट मत जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार यांच्या निर्णयाचे मोठे दुःख आहे. देशात आणि राज्यात मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबतचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्ते यांच्यावतीने शरद पवार यांना आवाहन करण्यात आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाल आहे..