Home Cities जळगाव जिल्ह्यातील ११ पोलीस कर्मचार्‍यांना महासंचालक पदक प्रदान

जिल्ह्यातील ११ पोलीस कर्मचार्‍यांना महासंचालक पदक प्रदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेली उत्तम कामगिरी आणि उल्लेखनिय सेवेबद्दल ११ पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी काढले आहेत.

 

पोलीस दलात सेवा बजावित असतांना उत्तम काम करणार्‍या राज्यभरातील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांचे प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून मागविण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील अनेक कर्मचार्‍यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असतांना वविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेली उत्तम कामगिरी आणि उल्लेखनिय सेवेबद्दल ११ पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

 

यांना मिळाले पदक

यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चालक विनयकुमार भिमराव देसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय हरिदास पवार, नरेंद्र हिरालाल कुमावत, पोहेकॉ सचिन सुभाष विसपुते, सुनिल अर्जुन माळी, मनोज काशिनाथ जोशी, राजेश प्रभाकर चौधरी, सुनिल माधव शिरसाठ, पोना विजय अशोक दुसाने, अल्ताफ सत्तार मन्सूरी, अमोल भरत विसपुते आणि पोलीस हवालदार रविंद्र घुगे यांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound