मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप नेते नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टिका करत ठाकरे कुटुंबाशी संबंधीत गोपनीय बाबी उघड करण्याचा इशारा दिला आहे.
आज भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, राऊत यांच्यामुळे शिवसेनेचे वाटोळे झाले. ते भाजप नेत्यांबाबत काही तरी वाह्यात बोलतात. त्यांनी असे बोलणे थांबविले नाही तर आम्हाला देखील ठाकरे कुटुंबाबाबत बरेच काही माहित असून ही माहिती आम्ही जगासमोर आणू. राऊतांना आवर घातला नाही तर ठाकरे कुटुंबाची अंडी-पिल्ली बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, संजय राऊत हे सत्यपाल मलीक यांना भेटणार असल्याच्या वृत्तावरून देखील त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, मलीक यांच्या वक्तव्याचे पाकिस्तानने स्वागत केले आहे. यामुळे अशा मागणाला जर राऊत भेटायला जात असतील तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.