पिंपळगाव हरेश्वर येथे फिरते लोकन्यायालय संपन्न

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती पाचोरा व  वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २३ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये संक्षिप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर प्रकरण, वैवाहिक प्रकरण, न्यायालयातील प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे असे दिवाणी व फौजदारी खटले असे प्रलंबित ३० तसेच वादपूर्व १५५ केसेस निकाली निघून  १० लाख २५ हजार ९७० रुपयाची वसुली झाली.

 

यावेळी पॅनल प्रमुख जी. बी. औंधकर, पंच न्यायाधीश म्हणून अॅड. गोपाळ पाटील यांनी काम पाहिले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला जी. हिवराळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, वकील मंचाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे मंचावर उपस्थित होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये लोकन्यायालयाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या शिबिरात अॅड. एस. पी. पाटील यांनी मादक पदार्थ बळी धोका व निर्मूलन या विषयावर विस्तृत विचार मांडले तसेच अॅड. सुनील पाटील यांनी गर्भनिदान जाणीव या विषयावर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषण करतांना दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच यामुळे आपला वेळ, पैसा, नाती हे कसे जिवंत राहतात हे सांगून पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, ३० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात वादातीत व वादपूर्ण प्रकरणे तडजोडीने सोडवणे करता जास्तीत जास्त प्रकरण घेऊन सहभाग नोंदवावा व लोक न्यायालय या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा‌ असे आवाहन केले.

 

यांची होती उपस्थिती

यावेळी अॅड. डी. जी. पाटील, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. बापू महाजन, अॅड. एम. के. मोरे, अॅड. राजेंद्र परदेशी, अॅड. अरुण भोई, ॲड. अनिल पाटील, अॅड. निलेश सूर्यवंशी, अॅड. पी. बी. पाटील, अॅड. रनसिंग राजपूत, अॅड. अनुराग काटकर, अॅड. शांतीलाल सैंदाने, अॅड. भाग्यश्री महाजन, अॅड कविता किशोर रायसाकडा, अॅड. माधुरी जाधव, अॅड. ज्योती पाटील, अॅड. एन. एस. महाजन, अॅड. अविनाश सुतार, अॅड. डी. पी. पाटील, अॅड. नरेंद्र डकोरकर, अॅड. कैलास सोनवणे, अॅड. संदीप पाटील, अॅड. रवींद्र पाटील, अॅड. चंदन राजपूत, अॅड. प्रशांत नागणे, अॅड. प्रशांत भावसार, अॅड. गोसावी, अॅड. लक्ष्मीकांत परदेशी, अॅड. ईश्वर जाधव अॅड. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामसेवक  परदेशी, पोलीस कर्मचारी राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, रणजीत पाटील, न्यायालयीन कर्मचारी जी. आर. पवार, संजीव ठाकरे, दीपक तायडे, विजय पवार, अमोल चौधरी, ईश्वर पाटील, नितीन पाटील, सर्व वकील संघ सदस्य, न्यायालयीन कर्मचारी यांनी फिरते लोक न्यायालय (मोबाईल व्हॅन) यशस्वी साठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार अॅड. संजीव नैनाव यांनी मानले.

Protected Content