चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कारण नसतांना दाम्पत्यासह मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे दिलीपसिंग जगनसिंग परदेशी हे आपल्या पत्नी अलकाबाई याच्यासह वास्तव्याला आहे. रविवारी २३ एप्रिल रोजी गावातील विलास बाबुसिंग परदेशी, वैभव कैलाससिंग परदेशी, गौरव कैलासिंग परदेशी, कैलास बाबुसिंग परदेशी रा. रांजणगाव, चाळीसगाव यांनी काहीही कारण नसतांना दिलीपसिंग परदेशी यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच दिलीपसिंग परदेशी यांची पत्नी अलकाबाई आणि मुलगा रोहित परदेशी यांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी दिलीपसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विलास बाबुसिंग परदेशी, वैभव कैलाससिंग परदेशी, गौरव कैलासिंग परदेशी, कैलास बाबुसिंग परदेशी रा. रांजणगाव, चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.