जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील प्रशांत हॉटेल येथे ग्राहक व हॉटेल मालकात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जून बुंधे (वय-३४) रा. शिरसोली ता. जि.जळगाव यांच्यावर चॉपरहल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली. अजय विजू भिल आणि किरण कोळी दोन्ही रा.शिरसोली ता.जि.जळगाव अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ जळगाव रस्त्यावर असलेल्या प्रशांत हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेल मालक याचे अजय विजू भिल आणि किरण कोळी यांच्यात शनिवारी २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजता वाद सुरू होता. हे भांडण सुरू असल्याचे पाहून नितीन बुंधे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर अजय विजू भिल आणि किरण कोळी यांच्यासह इतर अनोळखी दोन जणांनी कमरेतून चॉपर काढून नितीन बुंधे यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या बुंधे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी रविवारी २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी अजय विजू भिल आणि किरण कोळी यांच्यासह इतर दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अजय भिल किरण कोळी या दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.