Home धर्म-समाज लांडग्याच्या हल्ल्यातील जखमींना ५० हजार भरपाई द्या : अनिल चौधरी

लांडग्याच्या हल्ल्यातील जखमींना ५० हजार भरपाई द्या : अनिल चौधरी

0
44


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरीकांना शासनाने त्वरीत मदत करावी म्हणून प्रहार जनशक्तीचे नेते अनिल चौधरी यांनी वन विभागाला निवेदन देऊन मागणी केली आहे. तसेच जखमी झालेल्या आदिवासी बाधवांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे.

रावेर तालुक्यात दि १७ रोजी पिंपळकुंड, गारबर्डी, यासह पाल परीसरातील सुमारे २२ नागरीकांवर लांडग्याने हल्ला केला होता. आर्थिक अडचणीत असलेल्या आदिवासी बांधवांवर औषध उपचार करायला सुध्दा पैसे नाही म्हणून त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते अनिल चौधरी यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार जनशक्तीचे गणेश बोरसे, सचिन महाजन,सुरेश पाटील, पिंटू धांडे,विकास पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound