Home Cities अमळनेर अजित पवार राष्ट्रवादीतच, आम्ही त्यांच्या सोबत- आ. अनिल भाईदास पाटील

अजित पवार राष्ट्रवादीतच, आम्ही त्यांच्या सोबत- आ. अनिल भाईदास पाटील

0
47


अमळनेर-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजित पवार यांनी भाजपात जाण्याबद्दलीची कुठलीही चर्चा झालेली नाही, अजितदादा हे राष्ट्रवादीत आहेत व आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अशी प्रतिक्रीया जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार व राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

 

अजित पवार हे पक्षांतर करत असल्याच्या चर्चांमुळे राज्यातले राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकारानंतर काही आमदार मुंबईत दाखल झाल्याचेही चर्चा होती. यात जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश आहे.  मात्र या विषयावर बोलतांना आमदार अनिल पाटील यांनी मी नियमितप्रमाणे अजित पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. भाजपामध्ये जाण्याबाबतची कुठलीही चर्चा अजित पवार यांनी केलेली नाही. किंवा माझ्यासोबत झालेली नाही. अजित पवार हे राष्ट्रवादीतच आहेत. व आम्ही त्यांच्यासोबतच आहोत असं यावेळी अनिल भाईदास पाटील यांनी म्हटलं  आहे.


Protected Content

Play sound