Home राजकीय अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठींबा ?

अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठींबा ?

0
33

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठींबा असल्याचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिली असून यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे.

अजित पवार यांच्या भोवती राज्यातील राजकारण फिरू लागले आहे. काल त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं स्पष्टीकरण दिले आहे आज मी आमदारांची कोणताही बैठक बोलावली नाही. एवढंच नाही तर सोमवारी कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, असे असले तरी अजितदादांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठींबा असून ते कोणताही निर्णय घेऊ शकतात असा दावा करणारे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने आपल्या वृत्तात केलेला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी उघडपणे अजितदादांसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे.


Protected Content

Play sound