लांडग्याच्या हल्ल्यात सात जण जखमी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दुर्गम भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रावेर तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे.ही घटना आज मध्यरात्री घडली असून घटनेची माहीती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारार्थ दवाखान्यात हलविले आहे.

रावेर तालुक्यातील सायबुपाडा पट्टयात रात्रीच्या सुमारास लांडग्याने झोपलेल्या नागरीकांवर अचानक हल्ला करून जखमी केले आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.लांडग्याने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले आहे.लांडग्याच्या हल्ल्यात इतर सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

Protected Content