यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मननेल येथील भोनक नदीवर चोपडा मतदारसंघाच्या आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या नीधीतुन मंजूर झालेल्या सिमेंट कॉंक्रीटिकरण बंधाराचे काम पुर्ण होण्याचा मार्गावर असून यामुळे पुनर्भरणाचे काम होणार आहे.
येथील गावकरी दरवर्षी लोक सहभागातून भोनक नदिवर पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम यशस्वीरीत्या राबवित असतात मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पुर आल्यावर बंधारे फुटुन अडविलेले पाणी पुर्णपणे वाया जात असे.
येणार्या काळात पाण्याची भासवणारी टंचाई लक्षात घेता शेतकरी बांधवांनी भविष्यातील उद्धभवणार्या जलसंकटावर मात करण्यासाठी भोनक नदीवर कायम स्वरुपी सिमेंट कॉंक्रीटिकरण बंधारे बाधण्यासाठीची मागणी नागरीकांनी माजी आ.चद्रकांत सोनवणे यांचा कडे केली होती.
नागरीकांच्या मागणीला प्रतिसाद देत आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांनी या परीसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आमदार निधीतुन ४६ लक्ष रुपये खर्च करून मोठा सिमेंट कॉंक्रीटिकरण बंधारा मंजूर केला व सदरचे बंधार्याचे काम हे अंतीम टप्प्यात आले आहे. शेतकरी बांधवांच्या दृष्टीने दरवर्षी पाण्याची पातळी ही खालावत असल्यामुळे ती वाढ व्हावी म्हणून बंधाराचे काम उकृष्ट पध्दतीने चागल्या दर्जाचे व जलतगतीने काम सुरु असून सदरचे हे काम पुर्णत्वाकडे आले आहे.
दरम्यान, आमदार निधीतुन तयार करण्यात आलेल्या बंधाराचे काम चांगल्या प्रकारे झाल्याने येथील बंधारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवीले जाणार असल्यामुळे या परीसरात खालावलेली पाण्याची पातळीत वाढ होवुन शेतकर्यांना याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.