Home Cities अमळनेर मानवाधिकारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली बोरोले

मानवाधिकारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली बोरोले


 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अमळनेर तालुकाध्यक्षपदी वैशाली गणेश बोरोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे याबाबतचे संघटनेचे नियुक्त पत्र देखील त्यांना प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुदाम पेंढारे यांनी ही नियुक्ती केली असून जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद माधव इंगळे व इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. वैशाली बोरोले ह्या एका संस्थेत शिक्षिका असुन ज्ञानार्जनाचे काम करतात. त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व व उत्तम कार्यशैलीमुळेच त्यांना हे पद मिळाल्याचे बोललं जातं आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!


Protected Content

Play sound