Home क्राईम जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


3suicide 163
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आयोध्या नगरमध्ये एका 35 वर्षीय तरुणाने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संदीप चंद्रकांत राजपूत (वय 3५ रा. साखळी ता. यावल, ह.मु.आयोध्यानगर) हे फर्टीलायझर कंपनीत कामाला होते. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकानावरून जेवणासाठी घरी आले. त्यानंतर साडेनऊ वाजता जेवण झाल्यानंतर त्यांनी कुणालाही काहीही न सांगता आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. श्री.राजपूत यांनी अचानक आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता. त्यांचे वडील चंद्रकांत पाटील हे तर बेशुद्धच झाले होते. मयत संदीपच्या पश्चात पत्नी दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound