मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात अवजड वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असतांना आज सकाळी पुन्हा एका अवजड वाहनाने एन्ट्री होत आहे. एका कांद्याने भरलेलेल्या ट्रकला भरधाव वाहन ओव्हरटेक करतांना एका रस्त्यावर उभ्या असलेल्या दुधाच्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान हाच अपघात दुपारी घडला असता तर एखादा मोठा अपघात झाला असता परिसरातून बोलले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील साई डेअरी यांच्या मालकीची दूध वाहक गाडी (एमएच १९ सीवाय ९०२१) ही गाडी रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कडेला उभी होती. त्याचवेळीअवजड वाहतूक करणारा ट्रक जात होता. त्याला ओव्हरटेक करत असताना दुसऱ्या बोलेरो पिकप गाडीने उभ्या दुध गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि गाडीजवळ उभा असलेला एक तरूण हे जखमी झाले आहे. दरम्यान, हाच अपघात जर दुपारी गर्दीच्यावेळी झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे अवजड वाहनांना शहरातून नेण्यात बंद करावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.