भुसावळ प्रतिनिधी । आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात फरार असणार्या आरोपीला आज बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ६ गुरंन २६९/२०१९ आर्म अॅक्ट कलम-३/२५,३४ प्रमाणे दिनांक ०५.०४.२०१९ रोजी ०५.२९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फरार आरोपी नामे शेख इरफान शेख बशीर वय-२५,रा मिलत नगर भुसावळ हा शहरातील मुस्लीम कॉलनी भागात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक देविदास पवार यांना मिळाली. यानुसार त्यांनी पथकानी निर्मिती करून सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले.
संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुलिंग, मनोज ठाकरे, पोहेका सुनील जोशी, जयेंद्र पगारे, पोना किशोर महाजन, पो का विकास सातदिवे, गजानन वाघ यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास पोहेका जयेंद्र पगारे करीत आहेत.