मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सात आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्यासह सात आमदार नॉट रिचेबल असल्याचे वृत्त दैनिक सकाळच्या ऑनलाईन आवृत्तीने दिले आहे. या वृत्तानुसार काल सायंकाळपासून अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांचे फोन लागत नाही. यामुळे ते नॉट रिचेबल असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आलेला आहे. तर आज सकाळी आठ वाजेपर्यंत या संदर्भात कुणीही अधिकृतपणे भाष्य केले नव्हते.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घटना घडत आहेत. यात अजित पवार हे सातत्याने सत्ताधार्यांवर कडाडून प्रहार करतांना दिसत आहेत. या पार्श्वभूमिवर तेच सात सहकार्यांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येताच प्रचंड खळबळ उडणे स्वाभाविक मानले जात आहे.