Home राजकीय आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढणार : मोर्चात केली घोषणा

आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढणार : मोर्चात केली घोषणा

0
38

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आदित्य ठाकरे यांनी आजच्या मोर्चात आपण ठाण्यातून निवडणूक लढवून जिंकणार असल्याची घोषणा केली आहे.

 

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याप्रकरणी आज ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ठाकरे यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, एक गद्दार सुप्रिया सुळे यांना जाहीर शिव्या देतोय, त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवलं जातंय. दुसरा एक गद्दार सुषमा अंधारे यांना शिव्या दिल्या, त्याला मांडीला मांडी लावून बसवलं जातंय. आज रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, पण पोलिसांनी मारहाण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला हे दुर्दैवी आहे. तसेच आपण ठाण्यातून निवडणूक लढवून जिंकणार असल्याचेही ते म्हणाले.

 

आजच्या मोर्चात आदित्य ठाकरे, अनिल परब, जितेंद्र आव्हाण आदींसह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तर नेत्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका केली.


Protected Content

Play sound