Home धर्म-समाज फैजपूर शहरात राम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फैजपूर शहरात राम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  श्रीराम नवमीनिमित्त फैजपुर येथील शिवमुद्रा ग्रुप छत्रपती शिवाजी नगरतर्फे श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

शहरातील श्रीराम मंदिर खंडेराव वाडी देवस्थान विविध ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी नगर येथून श्रीरामाची भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती फैजपूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा देखावा भव्यदिव्य शोभायात्रेत नागरिकांना बघायला मिळणार आहे. यावेळी प्रफुल्ल कासार, साजन चौधरी, योगेश तडवी, किरण चौधरी, सुरज गाजरे, विनोद कोल्हे, भुषण कोल्हे, हर्षद भंगाळे, टेनु गुळवे, राहुल नेमाडे, विशाल पाटील, विवेक चौधरी, डोलेश चौधरी, हर्षल पाटील, कार्तिक पाटील, देवांग कोलते, स्वयंम चौधरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound