Home धर्म-समाज चिमुकली अफीरा शेखने पुर्ण केला पवित्र रमजानचा रोजा

चिमुकली अफीरा शेखने पुर्ण केला पवित्र रमजानचा रोजा


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील अफिरा शेख या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीने पवित्र रोजा पूर्ण केला असून यामुळे तिचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

सर्वत्र मुस्लीम समाजबांधवांचे पवित्र रमजान महीन्याचा प्रारंभ झाले असुन, या निमित्ताने मुस्लीम बांधवांच्या वतीने रोजे ( उपवास ) ठेवण्यात येत आहेत. मुस्लिम समाजबांधवांकडून फज़रच्या नमाज पठणासह रोजे ठेवण्यात येतात . यावल शहरातील सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या पाच वर्षीय चिमकुली अफीरा फातेमा हिने पवित्र रमजान महीन्यातील रोजा ( उपवास ) ठेवल्याने तिच्या आजीसह आई , वडीलांनी व काका काबीज शेख समद यांनी तिला आशीर्वाद दिले  व समाज बांधव यांच्याकडून तिने दाखलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

 

अफीरा फातेमा हिला आजी, आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. या पाच वर्षीय अफीरा  याने रोजा ( उपवास ) सोडतांना  अल्लाहकडे नमाज पठणातुन प्रार्थना केली. तसेच तिचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound