मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एकाची २२ लाखांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी येथे राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीला त्याच्या मुलाला मंत्रालयात सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत खोटी आर्डर दाखवून एकुण २२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक उघडकीला आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे प्रविणचंद पांडूरंग दिघोळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे धुळे येथे राहणारा त्याचा मित्र चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा लहान भाऊ अनिल जवरीलाल ओसवाल यांच्याशी १५ वर्षापासून ओळख आहे.त्यानुसार प्रविणचंद दिघोळे यांचा मुलगा राजकुमार दिघोळे याला मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरी लावून देतो. आमची मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांशी ओळख असे सांगून विश्वास संपादन केले. नोकरी लावण्यासाठी २२ लाख रूपये लागतील असे सांगितले. त्यानुसार १० मे २०१८ रोजी प्रविणचंद दिघोळे यांनी शिवकॉलनी येथे त्यांच्या घरी प्रविणचंद दिघोळे यांनी सुरूवातीला ९ लाख रूपये दिले. उर्वरित पैसे लवकर देण्याचे सांगितले. त्यानुसरा प्रविणचंद यांनी पैशांची जुळवाजुळव करत २७ मे २०१८ रोजी पुन्हा ७ लाख रूपये दिले. दरम्यान, नोकरीसाठी जॉईनिंग ऑर्डरची दिली नाही म्हणून ओसवाल बंधुंना फोन केला असता दरवेळी वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करत होते. त्यानंतर मुंबईला चंद्रभान ओसवाल आणि त्याचा मित्र हरताली प्रसाद रोहिदास यांनी  बोलावून मुलाला दुसरीकडे नोकरीलावून देतो असे सांगून उर्वरित ७ लाख रूपयांची मागणी केली.त्यानुसार प्रविणचंद यांनी ऑनलाईन पध्दतीने उर्वरित रक्कम ट्रान्सफर केली. परंतू नोकरीचे लावण्यासंदर्भात कोणतीही ऑर्डर किंवा नोकरी लागली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून  चंद्रभान जवरीलाल ओसवाल, अनिल जवरीलाल ओसवाल आणि हरताली प्रसाद रोहिदास (पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content