Home Cities अमळनेर अमळनेरात बनावट नोट बाळगणाऱ्या दोन जणांना अटक

अमळनेरात बनावट नोट बाळगणाऱ्या दोन जणांना अटक


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्युज । अमळनेर शहरातील पैलाड भागात बनावट नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शुक्रवारी 24 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आले आहे.

 

अमळनेर सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरात असलेल्या पैलाड भागात एका बोला फॅशन मेन्स वेअर अँड टेलर या दुकानाजवळ संशयित आरोपी कैलासभाई शिवरामभाई भोया (वय 28, रा. कफवाडा जि. वलसाड गुजरात) आणि वसंत कालसिंग मुलकाशा (वय-23, रा. धारणी जि. अमरावती) हे दोघेजण दुचाकीवर येऊन दुकानाजवळ पाचशे रुपयाची बनावट देऊन वस्तू खरेदी करत असताना आढळून आले. ही घटना घडल्यानंतर अमळनेर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची चौकशी केली. या संदर्भात पोहेकॉ सुनील कौतिक हटकर रा. अंमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांची बनावट नोट, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 8 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.


Protected Content

Play sound