सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांची एनएसयुआयच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत एन. एस. यु. आय.विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन, राष्ट्रीय सरचिटणिस व महाराष्ट्राचे प्रभारी नागेश करियप्पा व एन.एस.यु.आय. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शेख यांनी नुकतीच कार्यकारणी जाहीर केली आहे.
यात रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिषदादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील युवकांना मध्ये धनंजय चौधरी यांचा दांडगा जनसंपर्क आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात. त्यांची निवड झाल्याने विद्यार्थी व जळगाव जिल्हा एन.एस.यु.आय ला नवा युवा चेहरा मिळाला आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीने जळगाव जिल्ह्याला एनएसयुआयमध्ये मोठे पद मिळाले आहे.