Home क्राईम स्थानिक गुन्हे शाखेची सट्टा पेढीवर धाड; दोन जणांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची सट्टा पेढीवर धाड; दोन जणांना अटक

download 1
download 1

download 1

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बस स्टँड परिसरात चालणाऱ्या सट्टा पेढीवर धाड टाकून दोन जणांना रंगेहात पकडले त्यांच्याजवळ मटका चालवण्याची साधन व एकूण दहा हजार रुपये रक्कम पोलिसांनी जप्त केले.

याबाबत माहिती अशी की, पहूर येथील बस स्टँड परिसरात चालणाऱ्या सट्टा पेढीवर जळगाव येथील पोलिसांनी धाड टाकून दोन जणांना अटक केली असून त्यांच्याजवळ मटका चालण्याची साधन रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल उमेश गिरी, भरतसिंग गोसावी, यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात आरोपी दिपक साहेबराव पाटील व अकील समशेर तडवी या दोघांना मुंबई पोलीस जुगार अॅट(12)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना अटक केली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सुधाकर अंभोरे, संदीप सावळे, उमेश गोसावी, दीपक पाटील या पथकाने धाड टाकून आरोपीला अटक केली. तपास एफएसआय अनिल अहिरे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound