जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।तालुक्यातील आमखेडा येथे कौटुंबिक वादातून ३ जणांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात शुक्रवार १७ मार्च रोजी जामनेर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ललित विनोद तांबे (वय-३५, रा. आमखेडा ता. जामनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्याच घरात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून गावातील शांताराम गणपत तांबे, सुनील शांताराम तांबे आणि दिनकर शांताराम तांबे यांनी ललित तांबे याला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्या पत्नीला देखील शिवीगाळ त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर ललित तांबे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शांताराम गणपत तांबे, सुनील शांताराम तांबे आणि दिनकर शांताराम तांबे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक योगेश महाजन करीत आहे.