Home Cities अमळनेर एसटी प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांचा स्मिता वाघांनी केला सत्कार

एसटी प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांचा स्मिता वाघांनी केला सत्कार


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  राज्यातील सर्व महिलांना एसटी बस मध्ये 50% भाड्याची सवलत सुरू झाल्याने माजी आ. स्मिता वाघ यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह बस स्थानकावर जाऊन सवलतीत प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार केला.

 

यावेळी त्यांच्यासोबत भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ छाया दीपक भामरे आणि खा शि मंडळाच्या उपाध्यक्षा सौ माधुरी प्रमोद पाटील यांचे सह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात एस टी बस मध्ये सर्वच महिलांना भांड्यामध्ये सरसकट 50 टक्के सवलत जाहीर केली होती,त्यानंतर अवघ्या आठच दिवसात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केल्याने स्मिता वाघ यांनी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले.यावेळी प्रवासी महिलानी देखील या सवलतीबद्दल आनंद व्यक्त करून या निर्णयाबद्दल आम्ही समाधानी असल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound