Home Cities अमळनेर मध्यरात्री बंद घरातून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

मध्यरात्री बंद घरातून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले


अमळनेर लाईव्ह ट्रेन न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गणेश कॉलनी परिसरात बंद घराचे दरवाजाच्या आतील कडी उघडून चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने मोबाईल व रोकड असा एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे  समोर आले आहे. याबाबत बुधवार १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शितल दीपक पवार (वय-४१) रा. गणेश कॉलनी, अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ मार्च रोजी रात्री ११ ते १५ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कडी आतून उघडून घरात प्रवेश केला.  घरातील कपाट उघडून सामान अस्तव्यस्त करून कपाटात ठेवलेले २० हजार रुपयांची रोकड सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound