Home क्राईम दुचाकी लावण्यावरून वृध्दाला मारहाण

दुचाकी लावण्यावरून वृध्दाला मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दर्ग्यासमोर दुचाकी लावू नको असे सांगितल्याचा राग आल्याने त्यातून दोन जणांनी दर्ग्यावर काम करणाऱ्या एका वृध्दाला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

म्हसावद येथे हजरत जलालोद्दीन बाबाचा दर्गा आहे याठिकाणी ताज मोहम्मद शेख वय ६९ हे काम करतात. या दर्ग्यावर १० मार्च रोजी म्हसावद गावातील अशोक रामचंद्र भाईजी व दिलीप पाटील हे दोघे आले, ते दर्ग्यासमोर दुचाकी लावत असतांना, ताज शेख यांना दोघांना याठिकाणी दुचाकी लावू नका असे सांगितले, त्याचा राग आल्याने अशोक भाईजी व दिलीप पाटील या दोघांनी ताज शेख  यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी ताज शेख यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अशोक रामचंद्र भाईजी व दिलीप पाटील दोन्ही रा. म्हसावद या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound