जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह इतर प्रलंबित विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत संपात सहभाग घेवून जोरदार घोषणा देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी समन्वय समिती बैठकीत पुकारलेल्या नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात जळगाव शहरातील मुख्याध्यापक, महसूल कर्मचारी, आरोग्य विभाग, शासकीय रूग्णालय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद १४ मार्च पासून बेमुदत संपात सहभागी झाले आहे. मागण्यांचा योग्य विचार होवुन “समान काम, समान न्याय” या नुसार मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात. अशा आषयाचे निवेदन सर्व प्राथमिक, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, आरोग्य संघटना, महसूल विभागातील कर्मचारी संघटना, पंचायत समिती विभागातील ग्रामसेवक, तलाठी, चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटना यासह विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारण्यात येवून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले