भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आमडदे येथील कै. दिनानाथ दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला दणदणीत यश लाभले आहे.
कै दिनानाथ दुध उत्पादक सहकारी संस्था आमडदे येथे झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत जिल्हा दुध संघाचे विद्यमान संचालक यांना पराभवाचा धक्का बसला.
या निवढणुकीच ओबीसी मतदार संघातून नानासाहेब प्रतापराव हरी पाटील ; महिला राखीव मतदार संघातून स्नेहल नंदु पाटील, रंजनाबाई प्रभाकर पाटील ; सर्वसाधारण मतदार संघातून जगदीश अशोक पाटील, सागर धर्मराज भोसले, हरिचंद्र रामेश्वर भोसले, रणजित भालचंद्र भोसले, सर्जेराव साहेबराव पाटील, नामदेव हिंमत पाटील, दिनानाथ अर्जुन पाटील, दिनानाथ सजन पाटील, प्रविण गजानन पाटील, मच्छिंद्र माणिक पाटील, दिनेश रावबा पाटील, आबा सोनार या सर्व पंधरा च्या पंधरा उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
या सर्व विजयी उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्ते, सभासद बंधु भगिनी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.