Home क्राईम किरकोळ कारणावरून दोघांकडून एकाला बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून दोघांकडून एकाला बेदम मारहाण


marhan tayar

जळगाव प्रतिनिधी । तुम्हाला कोण पाहिजे असे विचारल्याच्या कारणावरून दोघांना एकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली होती. याबाबत दोघांबाबत एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजयकुमार मधुकर गुरव (वय 30), रा. खुबचंद साहित्य टॉवर येथे राहतात. त्यांच्या बाजूला एक महिला राहते. त्या महिलेला भेटण्यासाठी रविवारी 2 मे रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तीन ते चार अनोळखी व्यक्ती आले. त्या महिलेचे घर शोधत असतांना तुम्हाला कोण पाहिजे ? असे विजय गुरवने विचारले. याचा राग निखील पाटील आणि राहुल कोल्हे या दोघांना आला. त्यांना रूमालात दगड ठेवून डोक्यावर मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान यातील इतरांनी देखील मारहाण करण्यास सुरूवात केली. वाद झाल्याने परीसरातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती. गर्दी पाहून चौघेजण पसार झाले. जखमीवस्थेत विजय गुरव याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात विजय कुमार यांनी दोघांवर कारवाई करण्याच्या मागण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound