केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांमधील वुमन सेल्सद्वारे विद्यार्थिनींसाठी व महाविद्यालयाच्या महिला  कर्मचारी वर्गासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर  जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आले.

 

 

या शिबिरासाठी ‘माधवबाग कार्डियक क्लिनिक जळगाव’ येथील डॉ. श्रद्धा माळी व डॉ.श्रेयस महाजन यांनी मार्गदर्शन केले याचबरोबर ‘डेंटल स्क्वेअर’ च्या डॉ.स्नेहा दहाड यांनी सुद्धा आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी ,उपप्राचार्य संजय दहाड अकॅडमीक डीन डॉ. प्रज्ञा विखार तसेच वूमन सेल समन्वयक हर्षा देशमुख आणि वूमन सेल्सच्या मेंबर शेफाली अग्रवाल, अश्विनी पाटील, वैष्णवी सरोदे , अर्चना सरोदे, अश्विनी देवराळे, सुरेखा वाणी,  हेमलता लढे यांनी सहकार्य केले.

 

या शिबिरा मार्फत स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आपण उपचाराद्वारे त्याचे निवारण कसे करू शकतो हे डॉक्टरांनी सांगितले या शिबिराला महाविद्यालयाच्या 100 विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

Protected Content