Home Cities यावल यावलमध्ये जीवंत वृक्ष पेटविण्याचा प्रकार

यावलमध्ये जीवंत वृक्ष पेटविण्याचा प्रकार

0
25
tree fire

tree fire

यावल प्रतिनिधी । येथील यावल-फैजपुर मार्गावर पंचायत समितीच्या व्यापारी संकुलाच्या जवळ असलेल्या जीवंत वृक्ष पेटवुन पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आहे.

याबाबतचे वृत्त असे की यावल शहरातील फैजपुर मार्गावर असणार्‍या पंचायत समितीच्या व्यापारी संकुलाच्या जवळ असलेले ५० वर्ष जुने निंबाचे जिवंत वृक्ष अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी पेटवुन दिले असल्याचे आज दिसून आले. परीसरातील व्यवसाय करणार्‍या मंडळी च्या निर्देशनात सकाळी ही बाब आल्याने त्यांनी तात्काळ बुंध्याला लावलेली आग विझवली. मागील काही दिवसापुर्वी यावल भुसावल मार्गावर देखील अंजाळे घाटाच्या जवळ अशाच प्रकारे रस्त्याच्या कडेला असलेली मोठमोठी वृक्ष पेटविण्यात आली होती. या घटनेची वन विभागाने दखल न घेतल्याने वृक्ष पेटवून पाडण्याचे प्रकार शहरात देखील होत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याच्या दृष्टीने ही अतिश्य गंभीर असुन, वन विभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचे वृक्ष प्रेमींकडून बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound