Home Cities अमळनेर चारचाकी वाहनाने दुचाकीला उडविले

चारचाकी वाहनाने दुचाकीला उडविले


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जानवे ते डांगर गावादरम्यान भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल अशोक गर्दे (वय-३६) रा. आंबोड ता. जि.धुळे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सुनिल हा १ मार्च रोजी आपल्या खासगी कामानिमित्त अमळनेर तालुक्यातील जानवे गावात दुचाकीने आलेला होता. काम आटोपून रात्री ९ वाजता दुचाकीने धुळे कडे जात असतांना जानवे ते डांगर गावादरम्यान पेट्रोल पंपाजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी चार चाकी वाहन (एमएच २० ईई ३९६९) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुनिल गर्दे हे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मयताचा भाऊ अमोल गर्दे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound