Home क्राईम जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात असलेल्या नवनाथ चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली, यात २ जण गंभीर दुखापत झाली आहे, या घटनेबाबत शुक्रवारी ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या गटातील सागर सुनील जाधव रा. हरी विठ्ठल नगर जळगाव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरुवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता सागरच्या आईला किरण सुरेश सैनताने आणि सुरेश निंबा सैंदाणे दोन्ही रा. नवनाथ चौक, हरीविठ्ठल नगर यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात काठी मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या गटातील किरण सुरेश सैंदाणे याने दिलेल्या पिराजीत म्हटले आहे की, मागील भांडणाचा कारणावरून प्रभाकर शिंपी, सागर शिंपी राजू शिंपी व इतरांनी किरणचे आई, वडील, बहिण यांना लाकडी काठ्यांनी व लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केली आहे. या दोघांनी दिलेल्या परस्पर विरोधात फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात किरण सुरेश सैंदाणे, सुरेश निंबा सैंदाणे, प्रभाकर शिंपी, सागर शिंपी व सागरचा मुलगा सर्व राहणार हरीविठ्ठल नगर यांच्याविरोधात शुक्रवारी ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक आणि सुनील पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound