जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात स्थानिक रहिवासीने गटार बंद केल्यामुळे सांडपाणी गटारीतून रस्त्यावर आल्याने डबके साचले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशी यांनी बुधवारी १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महापालिकेतील उपायुक्त गणेश चाटे यांच्याकडे लेखी निवेदनरातून तक्रार केली असून त्वरीत गटारीतील पाण्याचा निचरा करावा अशी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील गट नंबर २७७-२ मधील सोनी नगरातील एका रहिवासीने गटार बंद केल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून नगरिकांच्या घरासमोर पाणी साचून सेवाळे तयार होत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने नागरीकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या मदतीने गटारीतील सांडपाण्याची विल्हेवाट त्वरित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. उपायुक्त गणेश चाटे यांना मागण्यांचे निवेदन देवून सहाय्यक अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे. यावर येत्या दोन दिवसात समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन महापालिका प्रशासनकडून देण्यात आले आहे. या निवेदनावर निता पाटील, संगिता भालेराव, प्रियंका निकुंभ, माधुरी येवले, सोनाली जाधव, आदि महिलांची उपस्थिती होती. निवेदनावर शरद पाटील, ज्ञानेश्वर ताडे, विजय चव्हाण, मयूर भालेराव, मुकुंदा निकुंभ, विठ्ठल जाधव, भेयासाहेब बोरसे, नरेश बागडे, नारायण येवले, सरदार राजपूत, यशवंत पाटील, देविदास पाटील यांच्या आदी स्थानिक नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.