जळगाव (प्रतिनिधी) सन २०१८ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या मुद्द्यावरून आज जिल्हापरिषदच्या स्थायी समितीत जोरदार वाद झाला. या शिक्षकांना न्याय मिळत नाही, तोपर्यत इतर बदल्या करू नये असा ठराव करण्यात आला. या ठरावास विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही पाठिंबा दर्शिवला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सन २०१८ मध्ये आंतरजिल्हा बदली नुसार १७९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या विरोधात काही शिक्षक कोर्टात गेले. तर काही शिक्षकांच्या प्रशासनाने सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या. परंतु २९ शिक्षक असे आहेत, ज्यांच्यावर अन्याय होत असून ९० ते १०० किलोमीटर दूर महिला शिक्षकांना प्रवास करावा लागत आहे. त्या महिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण केले होते. हे उपोषण सोडविण्यासाठी नानाभाऊ महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, सर्व समितीच्या सभापती व प्रशानने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, त्यांची मागणी वर्षभरात पूर्ण होऊ शकली नाही. याचे पडसाद आज स्थायी समितीच्या सभेत उमटले.यावेळी नानाभाऊ महाजन व इतर सदस्यांनी मागणी केली की, जोपर्यत या शिक्षकांच्या सोयीच्या ठिकाणी बदली होत नाही. तोपर्यत जिल्हा परिषदमध्ये झालेल्या बदल्या रद्द ग्राह्य धरण्यात येऊ नये किंवा त्या पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी सदस्यांनी केली. तसेच शिक्षकांना न्याय मिळत नाही. तोपर्यत इतर बदल्या करू नये, यास सत्ताधाऱ्यांनीही पाठिंबा दर्शिवला आहे. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून कृषी विभाग वगळता सर्वच विभागाच्या पदोन्नती बाकी असून जोपर्यत शिक्षक पदोन्नती होऊन खालच्या लोकांना न्याय मिळत नाही. तोपर्यत कोणत्याही बदल्या करू नयेत यास सत्ताधाऱ्यानी देखील मान्यता देऊन एकमुखाने ठराव करण्यात आला. दरम्यान, ग्रामनिधीतील २० कोटीरूपये थकीत असून प्रशासनास याबाबत विचारणा केली असता त्यांनी केवळ २ लाखांची वसुली झाल्याचे सांगितले. भूजल सर्वक्षणात कर्मचारी वाढून मिळावेत, अशी मागणी मागील चार महिन्यापासून करत आहे. परंतू तेथे काम करणारा १ कर्मचारी होता तो देखील काढून घेण्यात आला आहे. पावसाळाचे दिवस सुरु होतील पण मनरेगाची काम ठप्प झाले आहे. मागील दोन वर्षांपासून विहिरींचा एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. प्रस्ताव मंजूर झाला तर प्रशासन म्हणते की, एका गावाला पाचच विहिरी द्यावयाच्या आहेत. यातून प्रशानाच भेदभाव यातून दिसत असल्याचा आरोप नानाभाऊ महाजन यांनी केला.
१५ जूनपर्यंत पदस्थापना करण्याची मागणी
दरम्यान, रेखा डाळवाले व भारती बोरसे या दोन शिक्षिका मागील वर्षी आतंरजिल्हा बदलीच्या माध्यमातून जिल्ह्यात आल्या आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यांना दुर्गम भागात बदली देण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी १५ जूनपर्यत पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे ‘लाईव्ह ट्रेड न्यूज ‘ च्या प्रतिनिधींशी बोलतांना केली आहे. न्याय न मिळाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
पहा शिक्षक बदलीबाबत काय म्हणाले नानाभाऊ महाजन व व्याथा मांडताना शिक्षिका