जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या तरूणाच्या पत्नीचा फोटा बनावट इन्टाग्रामवर अपलोड करून पत्नीसह तिच्या भावाला शिवीगाळ करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , २५ वर्षीय तरूण हा जळगाव शहरातील एका भागात पत्नीसह वास्तव्याला आहे. २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी रोजीच्या कालावधीत तरुणाच्या पत्नीचे फोटो अपलोड करून बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले. इंस्टाग्राम खाते तयार करून पत्नीसह तिच्या भावाला अश्लील शिवीगाळ करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तरुणाने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.