जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण गेल्या पाच वर्षांपासून रखडले होते. मात्र पाच वर्षांनंतर आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचा मुहूर्त लाभला असून ४ मार्च रोजी नियोजन भवनात सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा अंतर्गत कार्यरत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून सन २०१४-१५, २०१५-१६ व सन २०१६-१७ या वर्षासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य ठरणाऱ्या ग्रामसेवकांचे आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येका गटातून एक सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. असे तीन वर्षातील ४३ ग्रामसेवकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण कार्यक्रम मान्यवरांच्याहस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी अमन मित्तल, जि.प. सीईओ डॉ पंक ज आशिया, अतिरिक्त सीईओ बाळासाहेब मोहन आदी उपस्थित राहणार आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थितीत राहावे, असे आवाहन मुख्यलेखा व वित अधिकारी बाबुलाल पाटील, उप मुख्यकार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, स्नेहा कुडचे पवार यांनी केले आहे.
…..सन २०१४-१५ यावर्षासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
शितल पाटील पिंगळवाडे ता. अमळनेर, विकास पाटील वाक. ता.भडगाव, गणेश सुरवाडकर मांडवेदिगर, ता. भुसावळ, दिनेश वळवी निमखेड, ता.बोदवड, दीपक जोशी कोळंबा, ता. चोपडा, हरिभाऊ पाटे तळोदे प्र.चा. ता. चाळीसगाव, प्रल्हाद पाटील जळू. ता. एरंडोल, प्रतिभा पाटील,मादणी, ता. जामनेर, रवींद्र चौधरी,परधाडे ता. पाचोरा, ज्ञानेश्वर साळुंके ईंधवे ता.पारोळा,रविंद्र नागरूद,बोदवड,देवीदास पाटील,मांगी ता. रावेर, सुनिल फिरके,वढोदे प्र. सावदा, ता. यावल यांचा समावेश आहे.
….सन २०१५-१६ यावर्षासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
कविता सांळुखे,ढेकूसीम,ता.अमळनेर, भिला बोरसे,खेडगाव ता.भडगाव, गोविंदा राठोड, पिंपळगाव बु. ता. भुसावळ, पंढरीनाथ झोपे,मनूर बु.ता.बोदवड, नंदकिशोर सोनवणे,भाडू.ता.चोपडा, दिलीप अहिरे सायगाव ता. चाळीसगाव, नारायण माळी जवखेडे खु. ता. एरंडोल, संदीप महाजन कल्याणेहोळ ता. धरणगाव, रुपाली साळुखे,डोमगाव,जळगाव, भास्कर महाजन पळासखेडे, ता. जामनेर, अविनाश पाटील दुसखेडा, ता. पाचोरा, नरेंद्र साळुंखे आडगाव-तरवाडे खु. ता. पारोळा, मनोहर चौधरी कर्की, ता.मुक्ताईनगर, कुंदन कुमावत,विवरे खु.ता. रावेर, संजीव चौधरी चिखली खु. ता. यावल
……सन २०१६-१७ यावर्षासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
राजेश पाटील रणाईचे ता. अमळनेर, शरद पाटील वडगाव बु. ता. भडगाव, पंकज चौधरी जाडगाव ता. भुसावळ, चिंतामण राठोड राजूर ता. बोदवड, मधुकर चौधरी वेळोदे, ता. चोपडा. सविता पांडे चितेगाव ता.चाळीसगाव, रमेश पवार गालापूर ता. एरंडोल, अनिल पाटील अंजनविहिरे वाकी या धरणगाव, उल्हासराव जाधव,मोहाडी ता.जळगाव, गोविंदा काळे,बिलवाडी, ता. जामनेर, स्वाती पाटील,गोरखेडा, ता.पाचोरा, प्रिती जढाल,पिप्री अकराउत ता. मुक्ताईनर,रविंद्र कुमार चौधरी,पुरी गोलवाडे ता.रावेर,रूबाब मोहम्मद तडवी,गाडऱ्या ता.यावल यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.