यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील यावल तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या व शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन समस्यां सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्यावर होणारे अन्याय लवकरात लवकर दूर करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला किमान बारा हजार रुपये भाव देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी ८ दिवसांत खरेदी करुन आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसे न झाल्यास आपण संघटनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, अध्यक्ष शेतकरी संघटना यावल गोकुळ कोळी, उपाध्यक्ष योगेश कोळी, तालुका संघटक राकेश भंगाळे, तालुका सरचिटणीस नितीन सपकाळे, सोशल मीडिया अध्यक्ष सचिन कोळी, फैजपूर शहराध्यक्ष मोहसिन भाई, विक्की, यावल शहर अध्यक्ष नितीन बारी , सुनील बोदडे, दिनकर गवळी, धनसिंग सपकाळे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावलचे तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले.