Home क्राईम भयानक : भीषण आगीत तीन गुरांचा होरपळून मृत्यू

भयानक : भीषण आगीत तीन गुरांचा होरपळून मृत्यू

0
41


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील अहीरवाडी येथील गावातील शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने भीषण आगीत तीन गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यात दोन म्हैस व एका बैलास समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहीरवाडी येथील शेतकरी दगडू मगू लासुरे यांच्या गुरांच्या गोठ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत दगडू लासूरे यांची दोन म्हैस आणि एक बैलाचा भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच शेतातील लाकडी अवजारे, नळ्या, पाईप पुर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांन सांगितले.


Protected Content

Play sound