जनरेटरमधून डिझेलची चोरी.

 

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील निंभोरा शिवारातील शेतातील शेडजवळील जनरेटरमधून १८ हजार रूपये किंमतीचे डिझेल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील निंभोरा शिवारातील शेतात असलेल्या शेडमधील असलेल्या जनरेटरमधून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रूपये किंमतीचे ८० लिटर डिझेल चोरून नेल्याचे सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले. यासंदर्भात केतन कैलास भांडारकर रा.भडगाव यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी करीत आहे.

Protected Content