Home आरोग्य पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांची तात्काळ नियुक्ती

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांची तात्काळ नियुक्ती

0
27

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ग्रामीण रूग्णालयात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय अधिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धरणगाव येथील स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना अभावी रुग्णांचे हाल होत असल्या कारणामुळे आज स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून तात्काळ वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली.. पालकमंत्र्यांनी आज तात्काळ संध्याकाळी सहा वाजेला डॉ. प्रसाद पाटील यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेमणूक केली.

दरम्यान, आज ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर हजर झाल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी त्यांच्या सत्कार केला. याप्रसंगी माजी गटनेते विनय भावे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख भैया भाऊ महाजन ,शहर प्रमुख विलास महाजन, रवी महाजन, तौसीफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते भीमराज पाटील, हेमराज चौधरी, नामदेव मराठे, तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound