Home क्राईम ब्रेकिंग! शुल्लक कारणावरून तरूणावर चॉपरने हल्ला!

ब्रेकिंग! शुल्लक कारणावरून तरूणावर चॉपरने हल्ला!

0
37


चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | किरकोळ कारणावरून एका तरूणावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची थरारक घटना शहरातील हरगीरबाबा नगरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील हरगीरबाबा नगरातील दिनेश शिवाजी कोर (वय-२१) हा मनोज लोटन भोई व हर्षल दीपक झोडगे या मित्रांसोबत पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरूसाकडे रात्री ७:३० वाजताच्या सुमारास हरगीरबाबा नगर पाटणा रोड येथून जात होते. तेवढ्यात समोरून कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी हे मोटर सायकलवरून आले. तेव्हा कन्हैयाने माझ्याकडे काय बघत आहे. असे सांगून शिवीगाळ केली. त्यात मनोज लोटन भोई याने त्याला शिवीगाळ करू नको असे सागितले. मात्र याचाच राग आणून कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी या दोघांनी मनोज लोटन भोई यांच्या हातावर, गळ्यावर व पोटावर चॉपरने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. त्यावर तत्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर औषधोपचार सुरू आहे. तत्पूर्वी या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश शिवाजी कोर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound