Home धर्म-समाज फैजपूर पो.स्टे.तर्फे रोजा इफ्तार पार्टी

फैजपूर पो.स्टे.तर्फे रोजा इफ्तार पार्टी


5ac09437 3a47 4445 a394 a336a5798478

फैजपूर (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनतर्फे पवित्र रमजान महिन्यानिमित्त आज (दि.२) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी येथील पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, स.पो.नि दत्तात्रय निकम, म.सा.का. संचालक नरेंद्र नारखेडे, नगरसेवक शेख कुर्बान, कलीम खा मन्यार, प.स.सदस्य सर्फराज तडवी, कृ.उ.बा संचालक मिलिंद महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मारुळ उपसरपंच अकिल शेठ, न्हावी सरपंच नितीन चौधरी, शांतता कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शेख इकबाल हुसेन, माजी नगरसेवक शेख जफर शेख अजगर, महेबूब पिंजारी, शेख जलील, जावेद जनाब, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अन्वर खाटीक, सेवा निवृत्त पोलीस शेख शकील शेख दगु, बामनोद उपसरपंच दिलीप भालेराव, तुषार बोरसे, उज्वल बोरसे, आवेश भांजा, शेख आरिफ, फैजपूर पो.स्टे हद्दीतील पोलीस पाटील, पत्रकार यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स.पो.नि. दत्तात्रय निकम, पो.हे.कॉ. मोहन लोखंडे, राजेश बऱ्हाटे, यशवंत टहकाळे, हेमंत सांगळे, इकबाल सैय्यद, विनोद पाटील, गोकुळ तायडे, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound